30th May 2022
जगाचं बदलतं स्वरूप आणि साथीच्या काळात बहुतेक लोकांच्या सकाळची सुरूवात आता वेगळी होत आहे. हातात स्मार्टफोन आणि सोशल मीडिया हँडल पाहण्याऐवजी गरमागरम हेल्दी नाश्ता आणि सकाळच्या व्यायामाने होतो. त्यानंतर दिवसभराचा गाडा चालवला जातो. ऑफिस, लोकलची गर्दी, कौटुंबिक गोष्टी यामध्ये आपण अडकतो. पण या सगळ्यात तारेवरची कसरत असते ती म्हणजे महिलांची.
असंख्य गोष्टी महिलांवर अवलंबून असतात. जसं की, मुलांच्या शाळेच्या गोष्टी असो किंवा ऑफिसमधील महत्वाची मिटिंग. या सगळ्यात मात्र महिलांच्या खाण्याच्या सवयीकडे आणि पर्यायाने आरोग्याकडे दुर्लक्ष होते. महिलांमध्ये खाण्याच्या चुकीच्या सवयींमुळे पौष्टिकतेची कमतरता निर्माण होते, विशेषत: कॅल्शियमची जी महिलांच्या हाडांचे आरोग्य सुधारण्यासाठी अत्यंत महत्त्वाची असते, जी वाढत्या वयाबरोबर बिघडते. खाण्याच्या चुकीच्या सवयींमुळे आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात आणि उपचार न केल्यास जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. (फोटो सौजन्य - टाइम्स ऑफ इंडिया)
For more details:-
https://maharashtratimes.com/lifestyle-news/health-news/common-types-of-eating-disorders-know-about-causes-and-effects/articleshow/91783921.cms?story=4
https://tamil.samayam.com/lifestyle/health/international-womens-health-day-2022-eating-disorders/articleshow/91854099.cms
Tomato Flu: Spread & Symptoms explained by our Pediatric intensivist Dr Irfan Ali
Somaiya Ayurvihar Complex,
Eastern Express Highway,
Sion(E), Mumbai - 400 022
View On Maps