- घर /
- आमच्या विषयी /
- दृष्टी आणि मिशन
दृष्टी आणि मिशन
सर्वाच्या फायद्यासाठी, काळजीकरता आणि समग्र होलिस्टिक उपचार पद्धतींचा विकास आणि प्रचार करणे हे आमचे ध्येय आहे
दृष्टि
सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामया। सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग् भवेत्।।
सर्व सुखी होवोत.
सर्वाना निरामयता लाभो.
सर्वाना पवित्र असे पाहता येवो.
कुणालाही दुःख सहन करावे लागू नये.
ओम शांती : शांती : शांती :
मिशन (ध्येय)
भगवदगीतेच्या मार्गदर्शक तत्वांनी प्रेरित होऊन पद्मभूषण श्री. करमशीभाई जे. सोमैया यांनी एकाग्रचित्ताने ध्यास घेऊन वैद्यकीय महाविद्यालयाची स्थापना केली
वेदना किंवा रोगाने पीडित सर्व व्यक्तींचे दुःख दूर करणे.
होलिस्टिक वैद्यकीय प्रणालीउदा. आयुर्वेद, योग, स्पोर्ट्स मेडिसिन, स्पोर्ट्स औषधे इत्यादींचा ऍलोपॅथी सोबत समावेश करणे.
अशा वैद्यकीय व्यावसायिकांना प्रशिक्षित करणे जे ही मार्गदर्शक तत्वे आत्मसात करतील आणि हे व्यावसायिक त्यांनी निवडलेल्या व्यवसायात सर्वोत्कृष्ट असतील.
देशात सर्वोत्तम असे वैद्यकीय शिक्षण पुरविणारे असो. (one line is remaining).
सर्व सुपर स्पेशॅलिटी उपचार एकाच ठिकाणी आणि एकाच छताखाली पुरविणे.
आमची मूल्ये
सेवा
न मानुषात परो धर्म ( मानवतेची सेवा सोडून अन्य कोणताही धर्म नाही. )
स्वागत
आम्ही सर्वांचे स्वागत करू.
अनुकंपा
आम्ही संवेदनशील राहू आणि काळजी घेऊ.
आधुनिक
आम्ही अद्ययावत आणि सर्वोत्कृष्ठ उपचार प्रदान करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करू .
संघटित काम
रुग्णांच्या गरजा पुरविण्यासाठी एक संघ म्हणून काम करणाऱ्या सर्वोत्तम डॉक्टर परिचारिका आणि पूरक कर्मचारी यांना आम्ही आकर्षित करणार आहोत.
समग्र दृष्टिकोन
आम्ही काळजी आणि उपचारांसाठी एक समग्र होलिस्टिक दृष्टीकोन आणू . उत्तम आधुनिक औषधे उपचारांसाठी उपचारांसाठी आयुर्वेद योग आणि एकतर पद्धती व दृष्टिकोन आम्ही एकत्र आणणार आहोत .
संशोधन आणि शिक्षण
आम्ही सध्याच्या उदयोन्मुख थेरपिंना समजून घेण्यासाठी संशोधन आणि शिक्षणासाठी व्यस्त राहू आणि नवीन दृष्टीकोन विकसित करण्यासाठी संशोधनाच्या अग्रस्थानी देखील राहू.
सचोटी
रुग्णांसोबत आणि समाजासोबत काम करताना आम्ही अखंडतेच्या सर्वोच्च मानकांचे पालन करू