- घर /
- आमच्या विषयी /
- सहाय्यक / संबंधित कंपन्या
सहाय्यक / संबंधित कंपन्या
आम्ही वैद्यकीय आणि संबंधित शिक्षणाच्या क्षेत्रातील व्यापक व्याप्ती आणि व्यापक एक्सपोजर प्रदान करतो.
क जे. सोमैया वैद्यकीय महाविद्यालय
के.जे. सोमैया मेडिकल कॉलेज हे मुंबईतील 22.5 एकर परिसरात स्थित एक खाजगी वैद्यकीय महाविद्यालय आहे. यात सुमारे १०५ पात्र अनुभवी शिक्षक व १०४ निवासी डॉक्टर आहेत. २१ सुसज्ज विभाग हे महाविदयालयात काम करते. इथे एमबीबीएस चा पदवी अभ्यासक्रम आणि बालरोग चिकित्सेतील पदव्युत्तर अभ्यासक्रम (एमडी) आणि प्रसूतिशास्त्र व स्त्री रोग (एमएस). हे अभ्यासक्रम उपलबद्ध आहेत.
+91 22 2409 0253
सोमैया नर्सिंग कॉलेज
२०११ पासून कार्यान्वित असलेले के.जे. सोमैया कॉलेज ऑफ नर्सिंग महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक यांच्याशी संलग्न आहे. भारतीय नर्सिंग कौन्सिल आणि महाराष्ट्र राज्य नर्सिंग कौन्सिलद्वारा दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार हे महाविद्यालय काम करत असून चार वर्षांच्या कालावधीचा नर्सिंग (बेसिक) पदवी अभ्यासक्रम येथे उपलब्ध आहे.
+91 22 2409 6585
सोमैया फिजियोथेरपी कॉलेज
के.जे. सोमैया कॉलेज ऑफ फिजिओथेरपी होतकरू फिजिओथेरपिस्ट्सना उत्तम शिक्षण देण्याचा प्रयत्न करते हे महाविद्यालय असे संशोधन हाती घेते ज्यातून फिजीओथेरपीच्या आधुनिक पद्धतींचा विकास केला जातो आणि उच्च दर्जाच्या आरोग्याचा पुरस्कार केला जातो. नजीकच्या भविष्यकाळात पी. एच. डी कार्यक्रम राबवण्याचे महाविद्यालयाचे लक्ष्य आहे.
+91 22 2409 1796
सोमैया विद्याविहार
सोमैया विद्याविहार संकुलामध्ये कला, विज्ञान, व्यवस्थापन, अभियांत्रिकी, वैद्यक, मानव्यविद्या , तत्त्वज्ञान आणि सामाजिक विज्ञान या विषयातील 34 वैयक्तिक संस्था आहेत. यात 38 9 2 विद्यार्थी आणि 1450 शिक्षक कर्मचारी आहेत.
+91 22 6728 3064
नरेशवाडी सेंटर फॉर लर्निंग
१९७४ मध्ये एकात्मिक ग्रामीण विकास मॉडेल म्हणून स्थापन केलेल्या, गिरीवनवासी प्रगती मंडळाच्या प्रायोगिक शेतीतील समृद्ध हिरव्या प्रदेशातील १२ एकरच्या परिसरात नरेशवाडी सेंटर फॉर लर्निंग स्थित आहे. या नरेशवाडीत प्रवेश दिलेल्या सर्व मुक वंचित कुटुंबांतील आणि ५ ते १७ या वयोगटातील पहिली ते १० वी पर्यंत शिक्षण घेत आहेत.
+91 99754 94211
एक बालकास मदत
आर्थिक स्थिती व दुर्लक्षित विदयार्थ्यांच्या पार्श्वभूमीकडे न पाहता त्यांना उच्च शिक्षण व प्रावीण्य मिळवण्यास सहाय्य करणे हे आमचे लक्ष्य आहे. आम्ही झोपडपट्ट्या आणि गावातील १००० विद्यार्थ्यांना त्यांचे स्वप्न साकार करण्यासाठी पाठिबा दिला आहे. त्यापैकी बऱ्याच मुलांना एकापेक्षा जास्त अभ्यासक्रमासाठी प्रायोजकत्व मिळाले आहे.
+91 22 2204 8272
आयुर्वेद
आयुर्वेद व पंचकर्म विभागाचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे आयुर्वेदिक औषधे आणि पंचकर्म चिकित्सा असलेल्या आजारांनी ग्रस्त झालेल्या मानवतेची सेवा करणे. अनुभवी डॉक्टरांच्या देखरेखीखाली प्रामाणिकपणे उपचार देणारे हे केंद्र आहे. आयुर्वेद, योग आणि ध्यान यामधील वैद्यकीय शिक्षणाचा प्रसार आणि प्रचार करण्याचा विभागाचा हेतू आहे.
सोमैया आयुर्विहार - आशियाई कर्करोग संस्था
आशियाई कर्करोग संस्था [ACI] पूर्वी ऑन्कॉलॉजी आशियाई संस्था म्हणून ओळखले जात होती. देशातील सर्वोत्तम ऑन्कॉलॉजी सल्लागार केंद्र म्हणून २००२ पासून वेलास्प्रिंग क्लिनिक पिरामल कॉम्प्लेक्स परेल येथे हा स्वप्नप्रकल्प दैनंदिन काळजी केंद्र म्हणून अस्तित्वात आला.